राहुल गांधी यांनी केलेली कृती म्हणजे मोदी पुन्हा निवडून यावे यासाठी केलेली अप्रत्यक्ष मदत

0
49

 – मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

(Nagpur)नागपूर – (Congress leader Rahul Gandhi)काँग्रेसचे नेते खा राहुल गांधी यांचे एकंदर कृत्य म्हणजे पुन्हा (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून यावेत, यासाठी केलेली अप्रत्यक्ष मदतच आहे असे वाटते. संसदेत अपमानजनक व्यवहार कुठल्याही खासदार यांच्याकडून अपेक्षित नाही, खासकरून असा व्यक्ती ज्याला पंतप्रधान व्हायचे आहे. असे कृत्य करून जगासमोर देशाचा गौरव कमी करण्याचे काम करत असेल तर अश्या कृतीला माफी नाही, जनता सुज्ञ आहे, आता त्यांना निवडणुकीत जनताच फ्लाईंग…. जागा दाखवेल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

आज नागपुरात माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आमचे सरकार आल्यापासून सरकार पडेल, असे स्वप्न विरोधकांना, काँग्रेस नेत्यांना पडत असतात. युती भाजपकडून तुटलीच नाही, उद्धव ठाकरे यांनीच युतीत जायचे नाही असे ठरवलं होतं. आमचे निरीक्षक, जेष्ठ अनुभवी नेते आले, असताना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी (Aditya Thackeray)आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात आले तेव्हाच आमच्या लक्षात आलं, त्यांना युती करायचीच नाही. तेव्हा जूने सर्व फुटेज काढा, किती वाजता युती तुटली त्यांच्या तीन दिवस अगोदर काय झालं ते पाहा असे आव्हान देखील मुनगंटीवार यांनी दिले.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा