ग्रंथालय शास्त्राचे ध्यासपर्व म्हणजे एस. रंगनाथन

0
55

 

(Nagpur)नागपूर, 9 ऑगस्ट
” ग्रंथालय शास्त्राचे जनक ” म्हणून ज्यांचा नावलौकिक होता, ते (Padmashri S. Ranganathan) पद्मश्री एस. रंगनाथन हे ग्रंथालय शास्त्राचे ध्यास पर्व होते. ग्रंथालयांच्या शास्त्रशुध्द रचनेसाठी, पुस्तकांच्या वर्गीकरणासाठी नव्याने तयार केलेली द्वीवर्ग पद्धती , ग्रंथालय शास्त्राची पंचसूत्री, या महत्वपर्ण योगदानासाठी एस. रंगनाथन यांना आपला देश कधीही विसरू शकत नाही.संपूर्ण भारतात ग्रंथालय चळवळ, ग्रंथालय संगठन, वाचन संस्कृती आणि संवर्धन यासाठी एस. रंगनाथन यांनी केलेल्या कठोर परिश्रमांना तोड नाही, असे प्रतिपादन सी. पी. अँड बेरार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ सुधीर बोधनकर यांनी केले. विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवासच्या वतीने आयोजित ‘ ग्रंथालय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

ग्रंथालय शास्त्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची महती सांगताना त्यांनी एस. रंगनाथन यांचा संक्षिप्त जीवनपट श्रोत्यांसमोर मांडला.एस. रंगनाथन हे ” ग्रंथालय महर्षी” होते आणि संपूर्ण जीवनभर त्यांनी ग्रंथालय विकासाचा ध्यास घेतला होता, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात , वाचन संस्कृती निर्माण करण्यात प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक असून ग्रंथालयाकडे जास्तीत जास्त तरुण वाचक वर्ग कसा वळेल यासाठी प्रयत्न करणे, हीच एस. रंगनाथन यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला (Vice President of Vidarbha Sahitya Sangh Dr.Rajendra Dolke)विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र डोळके , (General Secretary Vilas Manekar) सरचिटणस विलास मानेकर, (Shri Ulhas Kelkar)श्री उल्हास केळकर, (Dr. Indrajit Orke)डॉ . इंद्रजीत ओरके, (Library Director Prof. Vivek Aloni)ग्रंथालय संचालक प्रा. विवेक अलोणी, (Dr. Mona Poffre) डॉ . मोना पोफरे आणि इतर श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन (Prof. Mrs. Roshni Gatphane)प्रा. सौ. रोशनी गतफणे यांनी केले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा