निवडणूक आयुक्त निवड समितीत सरन्यायाधीश नाही

0
54

कॅबिनेट मंत्री असणार

(New Dellhi)नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Election Commissioner)केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीअसलेल्या समितीत बदल केला आहे. या समितीत आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यासह एक ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

सुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये ऐतिहासिक निकाल देत निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीत ऐतिहासिक बदल करत यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीशांची समिती सुचवली होती. सरकारने सरन्यायाधीश वगळून ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश केला आहे. केंद्र सरकारने योग्य कायदा करेपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांची समिती निवड करेल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं जाहीर करत या समितीत सरन्यायाधीशाऐवजी मंत्रीमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री असतील. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कदाचित हा वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता ही व्यक्त होत आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा