‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील 39 अमर शहिदांना श्रध्दांजली

0
107

(Nagpur)नागपूर,दि. 9 : येत्या (15 August)15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यास 76 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने देशभरात ‘हर घर तिरंगा अभियान’ जाहीर केले होते, त्याचप्रमाणे स्वतंत्राच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 39 शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती (District Soldier Welfare Officer Major (Dr.) Shilpa Kharapkar) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) शिल्पा खरपकर यांनी दिली आहे.

(‘Meri Mati Mera Desh’ campaign)’मेरी माटी मेरा देश’ अभियान 9 ऑगस्टपासून सुरू झाले असून स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणार आहे. या अभियानांतर्गत शहिदांना सन्मानपूर्वक श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे नागपूर जिल्ह्यातील 39 शहीद जवानामध्ये 1962 च्या भारत-चीन युद्धामध्ये शहिद झालेले सेकंड लेफ्टनंट गुरु चरण सिंग, 1965 भारत-पाक युद्धामध्ये गणर हरिभाऊ भुरे, सेकंड लेफ्टनंट पी व्ही बरोकर, मेजर देव एस एम यांचा समावेश आहे तर 1970 च्या भारत-पाक युद्धामध्ये सब लेफ्टनंट रवी वसंतराव मंडेलकर, 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये (C.F.N. Shankarrao Halwale) सी.एफ.एन. शंकरराव हलवले, (Anandrao Domaji Ghodeswar)शिपाई आनंदराव डोमाजी घोडेश्वर, शिपाई (Sharif Khan Abdul Mani Khan) शरीफ खान अब्दुल मनी खान,  (Govinda Domaji Ambagde)शिपाई गोविंदा डोमाजी अंबागडे,  (Captain AR Pedgaonkar)कॅप्टन ए आर पेडगावकर, (Gunar Manohar Petkar)गणर मनोहर पेटकर, (Ganar Vasantha P. Gawande)गणर वसंता पी. गावंडे, (Charandas dajiba Dhawale)शिपाई चरणदास दाजीबा ढवळे, (Nana Vithobaji Shahu Sangle)शिपाई नाना विठोबाजी शाहू सांगळे, ( Krishna Gajanan Khode)फ्लाईट लेफ्टनंट क्रिष्णा गजानन खोडे, (Vijay Vasant Tambe)फ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे, (Arun Vishnu Bakre)फ्लाईट ऑफिसर अरुण विष्णू बाकरे,(Harbal Singh Bajwa,) शिपाई हरबल सिंग बाजवा,(Kishore Singh Thakur)शिपाई किशोर सिंग ठाकूर,1972च्या भारत-पाक युद्धामध्ये (Flight Officer Chandrasekhar Harish Wankhede) फ्लाईट ऑफिसर चंद्रशेखर हरीश वानखेडे शहीद झाले.

1984 ऑपरेशन मेघदूतचे स्क्वॉडन (Leader Suvendra Gupta)लीडर सुवेंद्र गुप्ता शहिद झाले तर 1991 ऑपरेशन रक्षकचे (Lance Nayak Arvind Shankar Ambade) लान्स नायक अरविंद शंकर अंबादे, 1994 ऑपरेशन रक्षकचे ( Dilip Rajaram Thackeray)लान्स नायक दिलीप राजाराम ठाकरे 1996 ऑपरेशन रीन होचे शिपाई (Sunil Moti Ram Wasnik)सुनील मोतीराम वासनिक, 1996 ऑपरेशन रक्षकचे (Gangadhar Pundalik Belle) शिपाई गंगाधर पुंडलिक बेले, 1997 ऑपरेशन रीन्हो चे सुभेदार (Bhimrao Gaikwad) भीमराव गायकवाड ( उमरेड), 1997 बॅटल एक्सीडेंटचे (एम.टी.एक्सीडेंट) (Nayak Tejrao Dandi)नायक तेजराव दंदी, 1999 ऑपरेशन रक्षकचे शिपाई (Prakashan Rambhau Deshmukh) प्रकाशन रामभाऊ देशमुख (पारशिवनी) यांना वीर मरण आले.

2001 ऑपरेशन रक्षकचे  (Ratnakar Kalambe)शिपाई रत्नाकर कळंबे(नरखेड),2002 ऑपरेशन पराक्रमचे शिपाई (Prakash Bhaiyalal Tandekar)प्रकाश भैय्यालाल तांडेकर (कामठी), 2003 बॅटल एक्सीडेंटचे नायक (Baburao Gulabrao Dongre)बाबुराव गुलाबराव डोंगरे, 2004 ऑपरेशन रक्षकचे नायक (Sunil Kashiram Nakhate)सुनील काशीराम नखाते, 2005 ऑपरेशन रक्षकचे शिपाई (Shiv Prakash Verma)शिव प्रकाश वर्मा (सावनेर), 2006 ऑपरेशन रक्षकचे नायक (Shashikant Nathuram Junghare) शशिकांत नथुराम जुनघरे, 2007 ऑपरेशन रक्षकचे शिपाई (Shyam Vasantha Pawar) श्याम वसंता पवार (हिंगणा), 2012 ऑपरेशन हर्शील उत्तराखंडचे (Captain Rahul Ramesh Aher Rao) कॅप्टन राहुल रमेश आहेरराव, 2020 ऑपरेशन रक्षकचे नायक (Bhushan Rameshrao Satai)भूषण रमेशराव सतई (काटोल), 2020 लोकेशन-बांदीपोराचे (अंडर पी.एस चंदुरा, जिल्हा -बडगम) (जम्मू आणि काश्मीर) (G.D. Naresh Umrao Badole)ए.एस.आय./जी.डी. नरेश उमराव बडोले (सी.आर.पी.एफ.) (हिंगणा), 2021 लोकेशन -कोकहामेटा, जिल्हा- नारायणपूर,(छत्तीसगड) येथे कार्यरत असतांना माओवाद्यांनी गस्ती पथकास आई. ई.डी स्पोट घडवून आणल्यामुळे, हेड कॉन्स्टेबल (Mangesh Haridas Ramteke)मंगेश हरिदास रामटेके (आयटीबीपी) शहीद झाले. अशा एकूण 39 वीर अमर हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या अगणित बलिदानाची जाणीव या निमित्ताने करुन देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमात या शहीदांच्या सन्मान करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा