राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हीप जारी!

0
56

(New Dellhi)नवी दिल्ली-मोदी सरकारविरुद्ध संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी मतदानासाठी व्हीप काढले आहेत. (NCP Whip on No Confidence Motion) अजित पवार गटाकडून (Ajit Pawar) सुनील तटकरे यांनी व्हीप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे (Sharad Pawar) मोहम्मद फझल यांनी देखील व्हीप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत कोणत्या बाजुने मतदान करणार याची उत्सूकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर दोन व्हिप निघाले आहेत. लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत. त्यापैकी चार खासदार महाराष्ट्रातील तर एक खासदार लक्षद्विपचे आहेत. यापैकी (Supriya Sule)सुप्रिया सुळे, (Amol Kolhe)अमोल कोल्हे, (Srinivas Patil)श्रीनिवास पाटील आणि (Mohammad Fazal)मोहम्मद फजल हे खासदार शरद पवार गटात आहेत. तर सुनील तटकरे हे अजित पवार गटात आहेत. सुनील तटकरे यांनी काढलेल्या व्हिपमध्ये सर्वांनी मोदी सरकारच्या बाजूने आणि अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचे तर मोहम्मद फजल यांनी काढलेल्या व्हीपमध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसभा अध्यक्ष कोणत्या व्हिपला अधिकृत व्हिप म्हणून मान्यता देतात, याकडे पुढील कारवाईचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. व्हिपचे उल्लंघन हा पक्षांतर बंदीच्या कायद्यातील गंभीर गुन्हा समजला जातो व त्यातून अपात्रतेची कारवाई होते.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा