घरकुल देण्याच्या मागणीसाठी महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

0
49

 

(Amravti)अमरावती– अमरावती जिल्ह्यातील पाच बंगला फुकट नगर बडनेरा येथे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून नागरिक या जागेवर राहत आहेत. पण ही अधिकृत झोपडपट्टी घोषित न झाल्याने आमचा संसार उघड्यावर आहे. राहत्या जागेवर खाजगी जागा आहे, म्हणून जागा खाली करण्याचे आदेश महिलांना देण्यात आले. त्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. शासकीय जागेवर राहून आम्ही शासनाला कर देत आहे. अचानक आम्हाला खाजगी जागा आहे, म्हणून जागा खाली करून देण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आमचा संसार उघड्यावर येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच आम्हाला न्याय द्यावा, या मागणीसाठी महिलांनी जोरदार घोषणाबाजी व हातामध्ये पंचशील, तिरंगा व निळा झेंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी धाव घेतली आहे. खाजगी जागा आहे म्हणून जागा खाली करून दिल्यास आम्ही जायचं कुठे? असा प्रश्न महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांना नियमानुसार चौकशी करून बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा