
नागपूर :ज्यांच्याकडे कोणतेही प्रश्न शिल्लक नाही. ज्यांना शेतकरी, कष्टकरी तर्कसंगत प्रश्न मांडण्याची बुद्धी आता राहिलेली नाही, असेच लोक मुख्यमंत्री नाराज आहेत, अजित पवार मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदे पायउतार होतील अशा दंतकथा, अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. एकनाथ शिंदे कशासाठी नाराज होतील, तुम्ही एकनाथ शिंदेंना ओळखू शकले नाहीत. जो प्रवाहाच्या विरुद्ध जातो, नगर विकास मंत्री असताना सत्याचीच निवड करतात ते खरेच नाराज राहतील का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केला. तुम्हाला वाटत नाही का ,त्यांच्यामुळे जनतेच्या हितासाठी काम करणारे सरकार आले. एकनाथ शिंदे हे नेते आहे, ते नाराज होण्याचा प्रश्नच नाही.
सरकारमार्फत कोणत्याही विकास कामाना स्थगिती देण्यात आलेली नाही. जी कामे थांबली तिथे स्थगितीचा अर्थ त्या कामाचे पुनर्मूल्यांकन व्हावे यासाठी ती स्थगिती होती. एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी स्थगित कामाला मंजुरी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार वागत आहेत, असं म्हणणे म्हणजे अफवा पसरवणे आहे. कोल्ड वॉर सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते बोलले असे विचारले असता, विजय वडेट्टीवार याशिवाय काय बोलू शकतील. वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या मध्ये ‘कोल्ड वॉर ‘आहे, असे लोक म्हणतात आम्ही नाही. विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात संग्राम थोपटे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावे म्हणून अनेकांनी सह्या केल्या. आपल्या पक्षाचे काम आपण करावे. कोण नाराज आहे, या चर्चा करण्याचे काही काम नाही. राज्याचे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न मांडावेत असा सबुरीचा सल्ला वडेट्टीवार यांना मुनगंटीवार यांनी दिला.