अखेर दोन महिन्यांसाठी बाहेर..

0
245

 

नवी दिल्ली: मागील दीड वर्षापासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Bail for Nawab Malik) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे.
प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा, अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी कोर्टाने मान्य केली. मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून म्हणजेच जवळपास दीड वर्षांपासून कारावासात आहेत.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यास नकार दिला होता.
नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी मलिकांनी आधी हायकोर्टाकडे जामीनाची मागणी केली होती. त्यावेळी ईडीनं जोरदार विरोध केला होता. मात्र आज ईडीने सर्वोच्च न्यायालयात कोणताही विरोध केला नाही.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा