आता येणार नेपाळचे टोमॅटो!

0
44

नवी दिल्ली- टोमॅटोचे दर आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून टोमॅटो नाहीसे झाले असतानाच आता केंद्र सरकारने टोमॅटोचे दर खाली आणण्यासाठी ते नेपाळमधून आयात करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी इतरही काही पावले टाकल्याचे त्यांनी सांगितले.
देशात टोमॅटोची मोठी टंचाई निर्माण झाल्याने दर आकाशाला भिडले आहेत. सध्या टोमॅटोचे दर शंभर ते दिडशे रुपयांच्या दरम्यान आहेत. मागील दिड ते दोन महिन्यांपासून या दरात फारसा चढउतार दिसलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून टोमॅटो नाहीसे झाले आहेत. त्याऐवजी आता लोक टोमॅटो सॉसचा वापर करीत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, आता सरकारने नेपाळमधून टॉमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर किमान महिनाभरानंतर दर कमी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा