पंतप्रधान मणिपूरबाबत गंभीर नाहीत: राहुल गांधी

0
42

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत दोन तास 13 मिनिटे भाषण केले. त्यात शेवटी फक्त ते दोन मिनिटे मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान संसदेत हसून बोलत होते. विनोद करत होते. हे पंतप्रदानांना शोभत नसल्याची टीका राहुल गांधींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
जर देशात हिंसाचार होत असेल तर भारताचे पंतप्रधान त्याची खिल्ली उडवू शकत नाहीत. विषय काँग्रेस किंवा मी नव्हतो तर विषय मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होत आहे, आणि त्याला लगेच का थांबवले जात नाही, हा विषय आहे, असे राहुल म्हणाले.
गेल्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आणि ऐकले तसे कधीही पाहिले ऐकले नव्हते. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे, हे मी विनाकारण बोललो नव्हतो, ते पोकळ शब्द नव्हते, असेही राहुल गांधी म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा