शरद पवार, देवेंद्र फडणवीस एका मंचावर येणार

0
44

मुंबई- शेकापचे दिवंगत नेते व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या रविवारी होणाऱ्या अनावरणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मंचावर येणार आहेत. (NCP President Sharad Pawar and DCM Devendra Fadnavis) त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागेलेले आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एका मंचावर आले होते. सोबतच व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित हजेरी लावली होती. यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार आणि फडणवीस एका मंचावर येणार आहेत.
राष्ट्रवादीत बंडखोरी होऊन अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक गट एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. मात्र, शरद पवारांनाही सोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न असले तरी पवारांनी त्यांना अद्याप दाद दिलेली नाही. अनाकलनीय निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेल्या पवारांनी अ्दयापही भाजपविरोधी भूमिका कायम ठेवलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि फडणवीस हे एकमेकांबद्दल काय बोलणार, याची राजकीय वर्तुळात उत्सूकता आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा