संत्रा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात

0
51

 

अमरावती – संत्रा फळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने हिरव्यागार संत्रा बागांनी समृद्ध असलेल्या या परिसराला विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख मिळाली. विदर्भाचा संत्रा आंबट गोड चवीसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भात 90 हजार हेक्टरवर संत्र्याच उत्पादन घेतले जाते. परदेशातही संत्र्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे विदर्भातील संत्री बांगलादेशात निर्यात केली जातात. संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन नागपूर आणि अमरावतीमध्ये होते. अमरावतीमध्ये ४० हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड केली जाते. सध्या संत्राला आंबिया बहार आला आहे. मात्र, सांत्राला अज्ञात रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळ गळती होत आहे. या फळ गळतीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा