कुरुलकरला वाचविण्यासाठी देशद्रोहाचा कायदा रद्द होतोय का?-संजय राऊत

0
39

मुंबई- हेरगिरी प्रकरणात In case of espionage अटकेत असलेले Former DRDO Scientist Pradeep Kurulkar डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना वाचवण्यासाठी मोदी सरकारने देशद्रोहाचा कायदा रद्द केला का? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री Amit Shah अमित शहा यांनी संसदेत देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, कुरुलकर हे पूर्वी संघाचे कार्यकर्ते होते म्हणून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही का किंवा त्यांना वाचविण्यासाठी हा कायदा रद्द करण्यात येत आहे का? केंद्र सरकारने हा ब्रिटीशकालीन कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी या कायद्यालाही मागे टाकणाऱ्या कायद्यांचा वापर राजकीय विरोधकांना गुंतवण्यासाठी केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना 16 महिन्यानंतर वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाला. त्याचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले, राज्याचे मंत्री राहिलेल्या मलिक यांच्या खटल्याची अजून सुनावणीही सुरु झालेली नाही. त्यांची तब्येत खराब असतानाही त्यांना जामीन मिळत नव्हता. हा कोणता कायदा आहे?, असा सवालही त्यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा