15 ऑगस्ट निमित्त बाजारपेठा सजल्या, उद्यापासून खरेदीला जोर

0
37

 

नागपूर: स्वातंत्र्यदिन अर्थात 15 ऑगस्ट जवळ आल्याने बाजारात विविध साहित्य सजले आहे. खास देशप्रेम दर्शवणारे टी-शर्ट, कुर्ता, महिलांसाठी साड्या, ओढणी, पर्स, बांगड्या, ब्रेसलेट अशा विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. या वस्तूंना नागरिकांकडूनही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. स्वातंत्र्यदिननिमित्त बाजारपेठा सजल्याचे चित्र आहे. बाजारात देशप्रेम दर्शवणारे, एकतेचा संदेश असणारे आणि देशाचे नाव लिहिलेले टी-शर्ट यांनी शहरातील महाल, इतवारी, गोकुलपेठ, सक्करदरा आदी ठिकाणी कपड्यांची दुकाने सजलेली आहेत. तिरंगी रंगामध्ये बांगड्या, ब्रेसलेट, हेअर बॅन्ड, ब्रॉच रबर बॅन्ड उपलब्ध असून याची विक्री १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत होत आहे. गेल्या वर्षी हे टी-शर्ट १०० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होती; परंतु यंदा या टी-शर्टमध्ये विविध प्रकार उपलब्ध झाले. आता १२० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा