
श्रीनगर SHRINAGAR : भारतीय वायुसेनेने संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला असून आता श्रीनगर तळावर आधुनिक मिग-२९ विमानांचे MiG-29 aircraft स्क्वाड्रन तैनात करण्यात येणार आहे. या विमानतळापासून चीन आणि पाकिस्तानाच्या सीमा जवळ आहेत. (Jammu and Kashmir) भविष्यातील सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तळावर मिग-२१ बायसन विमानांचा स्क्वाड्रन तैनात होता. मात्र, आता त्यांची जागा आधुनिक मिग-२९ विमाने घेणार आहे.
या तळावरून आता चीन व पाकिस्तानच्या हालचालींवर नजर राहणार आहे. भारतीय वायुसेनेचे Indian Air Force स्क्वाड्रन लीडर विपुल शर्मा यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, काश्मीर खोऱ्यात असलेल्या श्रीनगर येथील वायुसेना तळाची उंची मैदानी भागापेक्षा जास्त आहे. येथे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमा आहेत. अशा परिस्थितीत अल्पावधीतच वेगवान प्रतिसाद देणार्या विमानांची गरज होती. मिग-29 हे विमान यासाठी योग्य आहे. कारण त्यामध्ये या परिस्थितीसाठी उत्तम आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. संघर्षाच्या वेळी शत्रूच्या लढाऊ विमानांना ठप्प करण्याची क्षमताही या विमानांमध्ये आहे. रात्रीच्या वेळी देखील हे विमान सक्रीय राहून महत्वाची कामगिरी पार पाडू शकते.