शरद पवार आणि अजित पवारांमध्ये गुप्त बैठक?

0
46

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती असून ही बैठक कोरेगाव पार्कमधील उद्योगजक अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दोन नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून चर्चेचा तपशील स्पष्ट झालेला नाही. तथापि, राष्ट्रवादीच्या गोटातून या भेटीला दुजोरा मिळालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यावर पक्षाचे दोन भाग झाले आहेत. मात्र, शरद पवार यांना एनडीएमध्ये आणण्याचे अजित पवारांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी बंडखोरीनंतर दोनदा अजित पवारांनी नेत्यांसह शरद पवारांची भेट घेतली आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नसल्याच्या भूमिकेवर पवार ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात ही गुप्त बैठक पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा