भाजप नेत्या सना खान यांची हत्याच, – जबलपूरवरून अटक करून आणले आरोपीला नागपुरात

0
53

 

नागपूर – पश्चिम नागपूर भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांची अखेर हत्या झाल्याचे उघड झाले असून जबलपूर येथून कुख्यात गुन्हेगार असलेल्या अमित शाहू यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली आहे. पोलीस पथक दोघांना अटक करून नागपुरात पोहचले असून आरोपीला आज न्यायालयात नेले जाणार आहे. सना खान यांच्या मृतदेहाचा अजूनही पत्ता न लागल्याने पोलिस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह कायम आहे. १ ऑगस्टला सना खान नागपूरवरून जबलपूरला गेल्या सकाळी पोहचल्याचा फोन आला मात्र नंतर कुठलाही संपर्क न झाल्याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार आईने मानकापूर पोलिसात दिली. अखेर कुटुंबियांच्या पोलीस तक्रारीनंतर मानकापूर पोलीसाची दोन पथके जबलपूरकडे रवाना झाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीमेत आठवडा उलटूनही थांगपत्ता न लागल्याने व्यावसायिक स्पर्धेतून हत्येचा संशय व्यक्त केला गेला. पोलिसांनी सुरुवातीला सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, तपासात अमितच्या भाऊ व ढाब्यावरील नोकराला ताब्यात घेत त्यानेच रक्ताचे डाग असलेले कपडे नदीत फेकले, कार धुतल्याचे सांगितल्यानंतर अमितवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून पुन्हा पोलिस रवाना झाले. नागपूर पोलिसांच्या दोन टीम जबलपूरला सना खानचा शोध घेण्यासाठी रवाना झाल्या होत्या. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या दोघांनी एप्रिलमध्ये लग्नही केल्याचे तपासात उघड झाले असून आर्थिक कारणावरून की आणखी कशातून ही हत्या करण्यात आली याचा उलगडा लवकरच पोलिस तपासात होणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा