फेक न्यूज पसरविणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार

0
44

नवी दिल्ली-सोशल मिडियावर खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार आहे. केंद्र सरकार त्यासाठी पावले उचलत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी लोकसभेत भारतीय न्याय संहिता विधेयक, 2023 सादर केले. या विधेयकात फेकन्यूज गुन्ह्यांसंबंधी विशेष तरतूद करण्यात आली असून संबंधित व्यक्तीीला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या विधेयकात कलम 195 अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक एका स्थायी समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यातील कलम 195 (1) D यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला किंवा सुरक्षेला बाधा आणणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा