THANE ठाणे : एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

0
108

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयातील घटना

ठाणे THANE  13 ऑगस्ट   : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात Chhatrapati Shivaji Maharaj Hospital of Thane Municipal Corporation एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांनी आयुष्य गमावले.

रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एकाच रात्री 17 रुग्णांना आपले प्राण गमावावे लागणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुन्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी निर्माण झालीय.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा