NAGPUR नागपुरात परिवर्तन महोत्सव तीन दिवस नाट्य, साहित्य आणि सांगीतिक कार्यक्रम

0
56

 

नागपूर -सर्वत्र गाजत असलेला परिवर्तन Arts Festival Nagpur कला महोत्सव नागपूर येथील चिटणवीस सेंटर आणि मिराकी परफॉर्मिंग आटर्स या दोन प्रसिद्ध संस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे .

जळगाव येथील नाट्य संस्था परिवर्तन जळगावच्या नाटकांचा व सांगीतिक कार्यक्रमांचा हा तीन दिवसीय परिवर्तन महोत्सव दि. १४, १५ व १६ ऑगस्ट दरम्यान होत आहे. परिवर्तन जळगाव ही नाट्य संस्था महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आपल्या नाटकृतींचा महोत्सव करीत असते. अतिशय सशक्त निर्मिती असलेल्या चार कलाकृतींचा अनुभव नागपूरकर रसिकांना मिळावा यासाठी चिटणवीस सेंटर व Miraki Theatre मिराकी थिएटरने पुढाकार घेऊन आयोजन केले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. १४ ऑगस्ट सोमवारी शंभू पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शीत अमृता साहिर इमरोज नाटकाचा प्रयोग होणार असून दि. १५ ऑगस्ट मंगळवारी श्रीकांत देशमुख लिखित व शंभू पाटील नाट्य रूपांतरीत, योगेश पाटील दिग्दर्शीत नली एकलनाट्य व जगप्रसिद्ध कवी अरूण कोलहटकर यांच्या भिजकी वही या काव्यसंग्रहाचे नाट्यात्मक सादरीकरण करण्यात येईल. दि. १६ ऑगस्ट बुधवार रोजी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आणि गाण्यांवर आधारित अरे संसार संसार हा सागींतिक कार्यक्रम परिवर्तनचे कलावंत सादर करणार आहेत.
कवी ना.धो. महानोर यांना हा महोत्सव समर्पित करण्यात आला आहे .
कार्यक्रमाची वेळ दररोज सायंकाळी ६.३० वाजेची आहे. १४ व १५ ऑगस्ट असे दोन दिवस चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे तर १६ ऑगस्ट रोजी अलग अँगल कम्यिनिटी आर्ट सेंटर, सेंट जॉन पॉल (द्वितीय) चर्च, सांदीपनी शाळेसमोर, हजारी पहाड या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण महोत्सव हा खुला असून कुठलेही प्रवेश शुल्क नाही. तरी प्रेक्षकांनी भरपूर उपस्थिती द्यावी असे आवाहन चिटणवीस सेंटर व मिराकी परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थाच्यावतीने करण्यात आले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा