
दरड कोसळून 9 आणि ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू
शिमला shimlaa 14 ऑगस्ट : हिमाचलप्रदेशात HIMACHAL मुसळधार पावसाच्या तांडवामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. राज्याच्या शिमला येथे दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोलान येथे cloudburst ढगफुटीमुळे 7 जणांना जीव गमवावा लागला आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे शिमला शहरात दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली 20 अडकले आहेत. शिमल्यातील समरहिल येथील शिव मंदिराला भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. सकाळी येथे पूजेसाठी आलेले 20 भाविक मंदिर कोसळल्यानंतर मंदिराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाकडून ढिगारी हटवण्याचे काम सुरू आहे. परंतु, हा ढिगारा इतका प्रचंड आहे की अद्याप एकही व्यक्ती सापडलेली नाही. सोलान जिल्ह्यातील कंडाघाट उपविभागातील जडोंन गावात ढगफुटीमुळे 2 घरे कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. बचाव पथकांनी इथे अडकलेल्या 2 जणांना वाचवले आहे. मंडी येथील नागचला येथे ढगफुटीनंतर पर्जन्यवाहिनीतला बराच कचरा वाहून महामार्गावर आला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागचला येथे ढगफुटी झाली असली तरी येथील रहिवासी घरं, दुकानं, वाचली आहेत. परंतु मंडी ते कुल्लू या दोन ठिकाणांना जोडणारा महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने महामार्गावरील डेब्रिज हटवण्याचं काम सुरू आहे.

हिमाचल प्रदेशमधील शिमला, चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी, लाहौल स्पिती आणि किन्नौर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पाऊस आणि पूराचा धोका असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालयं आणि शिक्षण संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातले 302 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. भूस्खलनानंतर तब्बल 200 बसेस वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्या आहेत. तसेच 1184 ट्रान्सफॉर्मर्स बिघडले असून अनेक भागांमधील वीज गेली आहे. अशीच काहीशी परिस्थिती उत्तराखंडची आहे. उत्तराखंडमधल्या मालदेवता येथील देहरादून डिफेन्स कॉलेजची इमारत कोसळली आहे. राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.