जामनेर येथे 777 फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची पदयात्रा

0
71

 

जळगाव JALGAW – जामनेर येथे Akhil Bharatiya Vidyarthi Parishad  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 777 फूट लांबीची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. प्रारंभी भारतमातेचे प्रतिमा पूजन तिरंगा फडकवत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते. ही तिरंगा पदयात्रा जळगाव रोड धारिवाल कॉलेजपासून ते गांधी चौकपर्यंत काढण्यात आली. पदयात्रेचा समारोप गांधीचौकात राष्ट्रगीत गाऊन करण्यात आला. तिरंगा पद यात्रेमध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी व नागरिक सामील झाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा