भाजपकडून मनसेला युतीची ऑफर?

0
129

मुंबई : NDA एनडीएमध्ये आता मनसेला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. BJP  भाजपने आपल्याला युतीची ऑफर दिली असल्याचे स्वतः राज ठाकरे यांनी सांगितल्याचा दावा केला जात आहे. (BJP Offer to MNS) वांद्र येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत राज ठाकरे Raj Thackeray यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत बोलताना भाजपच्या ऑफरचीही वाच्यता केली. भाजपसोबत आधीच EKNATH SHINDE एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मनसेही भाजपसोबत गेल्यास युतीचे नेमके गणित काय असेल, याबाबत काही कळायला मार्ग नाही. त्यामुळे भाजपच्या प्रस्तावावर मी अजूनही काही ठरवलेले नाही, असेही राज ठाकरे बोलल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा शरद पवारांच्या संमतीनेच घेतल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केलाय. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध सलोख्याचे आहेत, असेही राज ठाकरे बोलले आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा