“भाजपला मत देणारे राक्षस, मी शाप देतो..” : काँग्रेस नेता

0
67

नवी दिल्ली NEW DELHI –भाजपला BJP  मतदान करणारे राक्षस व मी महाभारताच्या भूमीवरून त्यांना शाप देतो, असे वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केले आहे. काँग्रेसने हरियाणातील उदय सिंह किल्ल्यावर जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी सुरजेवाला यांची जीभ घसरली. भाजपने या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून काँग्रेस पक्ष आता लोकांना शिव्या देखील देऊ लागल्याचे भाजपचे प्रवक्ते व खासदार संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
पात्रा म्हणाले की, राजकुमाराला वारंवार लॉन्च करणारा काँग्रेस पक्ष आता जनतेला शिव्या देऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या द्वेषाने आंधळे झालेले काँग्रेस नेते सुरजेवाला काय म्हणताहेत पाहा, भाजपला मत किंवा पाठींबा देणारी देशाची जनता राक्षस आहे. एकीकडे १४० कोटी लोकांचे प्रधानसेवक मोदी आहेत. ज्यांच्यासाठी जनताच देवाच्या रुपात आहे आणि दुसरीकडे काँग्रेसला जनता राक्षस वाटते. येत्या काळात जनताच यांच्या द्वेषाच्या दुकानावर कुलूप लावेल, असा टोलाही संबीत पात्रा यांनी लगावला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा