NCP राष्ट्रवादीची दुसरी टीम लवकरच ‘एनडीए’त-राज ठाकरे

0
93

मुंबई MUMBAI  :शरद पवार आणि अजित पवारांमधील Sharad Pawar and Ajit Pawar बैठकीवर आता राज ठाकरे, बच्चू कडू Raj Thackeray, Bachu Kadu यांच्यासारख्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शरद पवारांनी एक टीम आधी पाठवली असून दुसरी पण लवकरच जाईल, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray on Sharad Pawar) यांनी व्यक्त केली आहे. तर शरद पवार हे देखील अजित पवारांसह महायुती मजबूत करतील, असे प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले, एक टीम आधी पाठवली आहे दुसरी पण लवकरच जाणार आहे. आतून सगळे ऐकमेकांना मिळाले आहेत. 2014 सालापासून हे सर्व सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटण्याची जागा ‘चोर’डीया यांच्या घरीच मिळाली, ही कमाल असल्याचे ते म्हणाले. राजकारणातील सध्याचा घोळ पाहता महापालिका निवडणुका होणार नाहीत, असेही ते म्हणाले. आता निवडणुका लोकसभेच्या लागतील. त्यासाठी आम्ही चाचपणी आणि तयारी सुरू केली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

बच्चू कडू

दरम्यान, बच्चू कडू यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवाराचे बोलणे आणि कृती वेगवेगळी असल्याचे सांगितले. शरद पवार हे देखील अजित पवारांसोबत महायुती मजबूत करतील, असेही कडू म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा