संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन ; संत्री रस्त्यावर फेकून केला निषेध

0
32

 

अमरावती – अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा रस्त्यावर फेकून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होते आहे. यावर कृषी विभागाने उपाय योजना शेतकऱ्यांना सुचवल्या नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार येथे शेतकऱ्यांनी संत्री रस्त्यावर फेकून निषेध केला. झालेल्या नुकसानीची भरपाई देखील सरकारने द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा