समृद्धी महामार्गावर अवैध दारूविक्री विरोधात पोलीस प्रशासन सज्ज

0
38

 

बुलढाणा- समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या अनधिकृत स्टॉल्सवर दारू मिळत असल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्ह्यात मेहकरजवळ असलेल्या काही पेट्रोल पंपाजवळ अनेकांनी अनधिकृत हॉटेल्स थाटले असून अशा हॉटेल्सवर वाहन चालकांना सहजरीत्या दारू उपलब्ध होत आहे. यामुळे दारू पिऊन समृद्धी महामार्गावर ट्रक चालक भरधाव वाहने चालवतात हे उघड झाले आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर व मुंबई कॉरिडॉरवरील अनेक अनधिकृत स्टॉल्सवर दारू मिळत असल्याने वाहन चालक थांबतात. विशेष म्हणजे समृद्धी महामर्गाच्या बुलढाणा जिल्ह्यातील सेक्शनवरच तीन महिन्यात 700 हून अधिक अपघात झाले आहेत. 1 जुलै रोजी झालेल्या अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता. आता पोलीस प्रशासनाने वेगवेगळे पथक तयार केले असून अवैध दारू विक्री होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा