गडचिरोलीच्या ३३ पोलिसांना पोलिस शौर्य पदक

0
38

गडचिरोली: देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील 33 पोलीस अधिकारी व अंमलदारांना महामहीम राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” जाहीर झाले आहे. संपूर्ण देशभरात एकुण 229 पोलीस शौर्य पदक जाहीर (Police Medal for Gadchiroli Police Officers) झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 33 पोलीस शौर्य पदक ही निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. तसेच यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला 29 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते.असे मिळुन यावर्षी एकुन 62 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त प्राप्त झाले आहे.

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार

१) सपोनि. रोहीत फारणे, २) सपोनि. भास्कर कांबळे, ३) सपोनि कृष्णा काटे, ४) पोउपनि बाळासाहेब जाधव, ५) पोउपनि सतीश पाटील, ६) सफौ.सुरपत वड्डे, ७) सफौ. मसरु कोरेटी, ८) पोहवा दृगसाय नरोटे, ९) पोहवा संजय वाचामी, १०) पोहवा गौतम कांबळे, ११) पोहवा मोरेश्वर पुराम, १२) पोहवा मुकेश उसेंडी, १३) पोना विनोद डोकरमारे, १४) पोना कमलाकर घोडाम, १५) पोना देविदास हलामी, १६) पोना महारु कुळमेथे, १७) पोनाअं चंद्रकांत ऊईके, १८) पोनाअं पोदा आत्राम, १९) पोनाअं किरण हिचामी, २०) पोअं दयाराम वाळवे, २१) पोअं प्रविण झोडे, २२) पोअं दिपक मडावी, २३) पोअं रामलाल कोरेटी, २४) पोअं हेमंत कोडाप, २५) वारलु आत्राम, २६) पोअं माधव तिम्मा, २७) पोअं नरेश सिडाम, २८) पोअं रोहिदास कुसनाके, २९) पोअं नितेश दाणे, ३०) पोअं कैलास कुळमेथे, ३१) पोअं प्रशांत बिटपल्लीवार, ३२) पोअं मुकुंद राठोड, ३३) पोअं नागेश पाल यांना पदक मिळाले आहे. वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मौजा मर्दीनटोला येथे झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले असून, त्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा