NAWAB MALIK नवाब मलिक कोणाच्या तंबूत दाखल होणार?

0
63

मुंबई- NCP राष्ट्रवादीचे नेते  NAWAB MALIK नवाब मलिक यांना 17 महिन्यानंतर जामीन मिळाला आज ते तुरुंगाबाहेर येणार आहेत. अवघ्या दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन देण्यात आला असल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) हो राष्ट्रवादीतील कोणत्या गटात सामील होणार, याकडे लक्ष लागलेले आहे. कारागृहातून सुटल्यावर नवाब मलिक हे शरद पवारांना भेटतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे ते  AJIT PAWAR अजित पवार गटात जाण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांना वाटते.

मागील दीड वर्षांपासून कारागृहात असलेल्या मलिकांना वैद्यकीय कारणांसाठी दोन महिन्यांचा तात्पुरता जामीन मिळाला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारण आटोपताच त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजकीय निर्णय महत्वाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेले असताना नवाब मलिक हे कोणत्या गटाला जवळ करणार, याबद्दल उत्सूकता आहे. कारागृहातून सुटल्यावर ते शरद पवारांना भेटायला जातील, असे समजते आहे. त्यामुळे ते कदाचित शरद पवार यांच्यासोबतच राहतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा