जिल्हा बँकेत वीर पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण

0
33

 

अमरावती – आज स्वातंत्र्यदिन सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. सगळीकडे मोठ-मोठ्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे पण अमरावती जिल्हा बँक याला अपवाद ठरला आहे. आमदार बच्चू कडू यांची नुकतीच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आज स्वातंत्र्य दिवसानिमित्त बच्चू कडू यांच्याहस्ते होणारा ध्वजारोहणाचा त्यांनी तो मान अमरावती येथील शहीद वीर पत्नी सरस्वती ओंकार मासोदकर यांना दिला. यावेळी बँकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आ. बच्चू कडू यांची अमरावतीत तिरंगा सायकल रॅली

अमरावती – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार बच्चू कडू यांची पर्यावरण आणि तिरंगा सायकल रॅली आयोजित करण्यात आली. शहीद स्मारकापर्यंत ही सायकल रॅली होती. अमरावती शहरातील नेहरू मैदान येथून तर यावली शहीद गावापर्यंत असा 30 किलोमीटर ही सायकल रॅली असणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा