
मुंबई MUMBAI -शरद पवार SHRAD PAWAR हे मविआतील प्रमुख नेते आहेत, मात्र AJIT PAWAR अजित पवार आता BJP भाजपसोबत आहेत. या दोन नेत्यांच्या गुप्त भेटींमुळे संभ्रम निर्माण होत असून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनीच यावर स्पष्टीकरण देऊन संभ्रम दूर करायला पाहिजे, असी मागणी काँग्रेसचे वरीष्ठ नेते अशोक चव्हाण (Congress Leader Ashok Chavan) यांनी केली आहे.
चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी संभ्रम दूर केल्यास त्यानंतरच खऱ्या अर्थाने कामाला सुरूवात करता येईल व कार्यकर्त्यांनाही आपल्याला कोणत्या दिशेने काम करायचे आहे हे समजेल, असेही ते म्हणाले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. यापार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधून ही मागणी केली.
मविआचा प्लान बी
दरम्यान, शरद पवार व अजित पवार भेटीने काँग्रेस व ठाकरे गट सावध झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी संवाद साधला. शरद पवारांच्या हालचालींबाबत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली व राहुल गांधी यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. शरद पवारांशिवाय महाविकास आघाडी पुढे कशी नेता येईल, यावरही नेत्यांमध्ये प्लान बी वर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
