एसटी बसचा अपघात,10 ते 15 विद्यार्थी जखमी

0
46

 

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील सवणा ते चिखली दरम्यान एसटी बसचा अपघात झाला.स्टिअरिंग लोक झाल्याने ही गाडी उलटली. या अपघातात 10 ते 15 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. बसचा चालक सुद्धा जखमी झाला. ही बस सवणा वरून चिखलीकडे जात असताना हा अपघात घडला. यावेळी बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते.

 

आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू सखोल चौकशी – विजयकुमार गावित

मुंबई : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विद्यार्थ्यांचे नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला होता, मात्र दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता राज्याच्या आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण चौकशी करणार असल्याचे आदेश दिले असून, या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. या मुलाची गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब होती मात्र आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यासाठी आता दोषींवर कारवाई तर होणारच आहे मात्र या अशा गोष्टी टाळण्यासाठी आदिवासी विकास विभागाने कठोर अशा उपायोजना तयार करण्याचे देखील मागणी करण्यात येत आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा