वडील आणि दादामधील चर्चेची माहिती नाही-सुप्रिया सुळे

0
76

मुंबई MUMBAI – उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी Sharad Pawar and Ajit Pawar शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेत मी नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची मला माहिती नसल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या आणि अजितदादांच्या जन्माच्या आधीपासून चोरडिया आणि पवार कुटुंबाचे संबंध आहेत. या दोन कुटुंबातील व्यक्तिंनी भेटणे यात नवीन काही नाही. लोकशाहीत अनेकदा मतभेद असतात व ते असलेच पाहिजे. (supriya sule comment on ajit pawar)

नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ते मोठ्या हिंमतीने लढल.सत्याच्या बाजून राहिलेला हा दृष्टा नेता आहे. त्यांच्यावर राजकीय सुडाने कारवाई करण्यात आली. ते घरी आले याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी खूप सहन केले आहे. दरम्यान, या काळात अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या लेकी ज्या पद्धतीने लढल्या त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्या म्हणाल्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा