-यासाठीच अजित पवार हे शरद पवारांना भेटतात – विजय वडेट्टीवार

0
45

 

नागपूर -पृथ्वीराज बाबा चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांचा अनुभव आणि माहिती मोठी आहे. त्या आधारावर ते म्हणाले असतील. गुप्त बैठकीमध्ये आपण कोणीच नसतो. त्यावेळेस नेमकं काय झालं? याची माहिती बाबांकडे असेल त्यामुळे ते वक्तव्य केलं असेल. मुळात दोन पक्ष फोडूनही भाजपची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित पवार हे शरद पवार यांना भेटत आहेत. मास लीडर असलेले शरद पवार यांची गरज भाजपला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळेच अजित पवार शरद पवार यांना भेटत आहेत असा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
वडेट्टीवार म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे अजित पवार यांना अट घातली आहे की, शरद पवार आल्याशिवाय अजित पवार यांना मुख्यमंत्री होता येणार नाही. म्हणून अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह शरद पवारांना वारंवार भेटीतून करत आहेत.
मविआ बाबत बोलताना,शरद पवार साहेब आम्ही महाविकास आघाडी एकत्र आहोत, आज त्यांच्या भाषणाची प्रतीक्षा करू. शरद पवार आज भाषणातून काय म्हणतात? कुठल्या दिशेने त्यांचा विचार आहे? ते दिसेलच. आम्ही तिघे एकत्र आहोत. मात्र, तो संभ्रम लवकर दूर होईल आणि महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाईल असा विश्वास आहे
नवाब मलिक प्रकरणी ईडीने त्यांचा जामीनाला विरोध केला. मात्र, आरोग्याच्या कारणास्तव जामीन मिळाला. मध्यंतरी नवाब मलिक यांच्या मुली अजित पवारांना भेटल्याची माहिती आहे. त्यातून कदाचित त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला असेल. भारतीय जनता पक्ष कुठल्या खालच्या स्तरावर जातील या प्रश्नाचे उत्तर नवाब मलिक यांच्या निर्णयानंतर आम्ही देऊ. आम्ही मविआत तिन्ही पक्ष जागेचा आढावा घेत आहोत. जिथे विजयाची खात्री आहे, त्यावर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र ठरवतील. बारामतीची जागा काँग्रेसला मिळावी असे त्या ठिकाणी कार्यकर्त्याला वाटत असेल पण त्या- त्या परिस्थितीत0त्यावेळेस निर्णय घेऊ. प्रफुल्ल पटेल म्हणायचे मी तोंड उघडल तर पळता भुई कमी पडेल अशी धमकी द्यायचे. मात्र, आताचे त्यांचे वक्तव्य पाहता ते हास्यजत्रे सारखे वाटत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा