आम्ही महाविकास आघाडीबरोबरच राहणार – जितेंद्र आव्हाड

0
36

 

मुंबई -इंडिया बैठकीची जबाबदारी आघाडीवर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून मी आलो आहे. पवार साहेब दररोज सांगत आहेत.मी विचारधारेविरोधात जाणार नाही तरी तुम्ही काही पत्रकार संभ्रम करतात. अजून किती वेळा सांगायचे असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले मी कोणाच्या वक्तव्यावर बोलणार नाही. आमच्या शरद पवारांनी सांगितले विषय संपला.
आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहोत बरोबरच राहणार आहोत.
प्लॅन बी संदर्भात तुम्ही काँग्रेस नेत्यांना विचारा, एकदा स्पष्ट भूमिका घेतल्यावर कितीवेळा सांगायचे. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी टिव्हीवर येऊन सांगायला हवं का ,प्लॅन ए प्लॅन बी काही नाही, शरद पवार यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली
त्यांचे मोठे भाऊ शेकापमध्ये होते पण नाती तोडली नाही. शेवटी नाती ही नातीच असतात.बाळासाहेब ठाकरे आणि पवार यांच्यात पण नाते होते. भाजप शरद पवार यांना टार्गेट करून इंडिया कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी मंत्री, आ जितेंद्र आव्हाड यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा