भाजप नेत्या सना खानचा मृतदेह नर्मदा नदीत सापडला ?

0
71

 

नागपूर – (Bharatiya Janata Party leader Sana Khan)भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान यांचा मृतदेह (Narmada River)नर्मदा नदी पात्रात एका विहिरीत मध्यप्रदेशातील सिहोरी गावात घटनास्थळापासून सुमारे 400 किलोमीटरवर सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा महिलेचा मृतदेह सना खान यांचाच आहे का, याविषयी स्वतः आरोपी पती अमित शाहू तसेच सनाच्या नागपुरातील कुटुंबियांकडून ओळख पटल्यानंतरच पोलिसांचे शिक्कामोर्तब होणार आहे.

सना खान यांची आर्थिक वादातून डोक्यात काठीचे वार करून हत्या झाल्याचे व एप्रिलमध्येच मारेकरी अमित आणि सना यांचे लग्नही झाल्याचे उघडकीस आले आहे. जबलपूर येथून (Amit Shahu)अमित शाहूसह दोघांना अटक करून नागपुरात आणण्यात आले. न्यायालयाने आरोपीना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट पण केली जाऊ शकते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा