पुण्याकडे निघण्याच्या तयारीत असलेल्या वैमानिकाचा मृत्यू

0
339

नागपूर : नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी पुण्याकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असलेल्या इंडिगो विमानाचा वैमानिक मनोज सुब्रमण्यम (वय 40 वर्ष) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तातडीने बेशुद्ध अवस्थेतच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैमानिक मनोज सुब्रमण्यम यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी मेडिकल कॉलेज रुग्णालयात केली जाणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा