
– संजय राऊत
(Mumbai)मुंबई -शरद पवारांनी जे काल परखडपणे भाष्य केलं आहे, त्या देशाच्या भावना आहेत. शरद पवारांनी चिंता व्यक्त केलेली की, जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल असे प्रतिपादन शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी केले.
(Balasaheb Thackeray)बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हयातीत त्यांचा पक्ष तोडण्यात आला आणि फुटलेल्या पक्षाला चिन्ह आणि नावाची मान्यता दिली. शरद पवारांच्या सोबत देखील हेच झालं. देशाच्या संसदीय लोकशाहीची निवडणूक आयोगाच्या भविष्याची आम्हाला चिंता वाटत आहे. जसा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला जातो जे पक्षातून दूर गेले आहेत. म्हणजे त्यांना बाळासाहेबांचा विचार मान्य नाही. परंतु फुटून बाहेर गेलेल्या लोकांनी बाळासाहेबांचा फोटो वापरणं सुरू केलं तेव्हा देखील बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो वापरू नका. आज शरद पवारांच्या बाजूने देखील लोक फुटून गेले आणि म्हणतात की, शरद पवार हे आमचे लोकनेते आहेत. हे कसं काय, मग तुम्हाला शरद पवार कशाला हवेत? बाळासाहेब कशाला हवे आहेत? तुमच्यात धमक आणि हिम्मत नाही का? शरद पवार जर देव आहेत, तर त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला? बाळासाहेबांची शिवसेना का तोडली? असा सवाल केला.
इंडिया बैठक बाबतीत बोलताना इंडिया अलायन्सची तयारी अत्यंत जोरात सुरू आहे. 31 तारखेला ही बैठक ग्रँड हयात लमध्ये सुरू होईल. सत्तावीस नेत्यांना निमंत्रण केले आहे. पाच राज्यांचे मुख्यमंत्री असतील असेही संजय राऊत म्हणाले.
