
(SHARAD PAWAR)पवारांचा इशारा
(Mumbai)मुंबई- (NCP)राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar)अजित पवार गटाकडून वारंवार आपले छायाचित्र वापरले जात असून याविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे. (Shiv Sena)शिवसेनेच्या धर्तीवर राष्ट्रवादीतही चिन्हाबाबत हस्तक्षेप केंद्र सरकारकडून होण्याची शक्यता असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने स्वतः याबद्दल निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.
पवार म्हणाले, निवडणूक चिन्हामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. आजपर्यंत आपण बैलजोडी, गाय-वासरू, चरखा, पंजा आणि घड्याळ आदी चिन्हांवर निवडणुका लढवून विजय संपादन केला आहे, असे ते म्हणाले. केंद्राने १४ ऑगस्ट फाळणी दिन साजरा करण्यासंबंधी परिपत्रक काढून देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची शक्ती कमी झाली आहे. म्हणून काँग्रेस अधिक जागा लढवेल, या (Former Chief Minister Prithviraj Chavan) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी मागील लोकसभेत काँग्रेसने किती जागा जिंकल्या? आणि मागणी करायला काय लागते? असे प्रश्न उपस्थित केले. मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याच्या निर्णयाला मी केवळ अनुमोदन दिले होते, असेही ते म्हणाले.
