नवाब मलिक शरद पवारांसोबतच राहणार

0
63

(Mumbai)मुंबई-कारागृहातून जामीनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात रहायचे, याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आपण शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येय राहणार असल्याची भूमिका मलिकांनी जाहीर केली आहे.

मलिकांना आपल्या गोटात आणण्याचे (Ajit Pawar) अजित पवार गटाचे प्रयत्न होते. मात्र, त्यांनी त्यांनी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ईडीने नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती. न्यायालयाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ते दोन महिन्यांसाठी कारागृहाबाहेर आले आहेत. नवाब मलिक यांनी शरद पवारांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार आहे, असे मलिकांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मागील १८ महिन्यांच्या कालावधीत मला व माझ्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे सांगून मलिक म्हणाले की, सध्याच्या स्थितीत प्रकृतीची काळजी घेण्याला माझे प्राधान्य आहे. महिन्याभरात माझी प्रकृती सामान्य होईल, असा मला विश्वास असल्याचे ते म्हणाले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा