न भुतो न भविष्‍यती असा

0
70

 

हद्द २ एक अनहोनी घटना चित्रपटाचा मुहूर्त समारंभ… माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते

 

(CHANDRAPUR)चंद्रपूर (का.प्र.)

१५ ऑगष्‍ट भारतीय स्‍वतंत्रता दिवस या पावन दिवसाचे औचित्‍य साधुन अमृत महोत्‍सवी हद्द २ एक अनहोनी घटना या परिवारिक मराठी चित्रपट निर्मितीचा मुहूर्त स्‍थानिक एन.डी. हॉटेल नागपूर रोड चंद्रपूर येथे थाटामाटात संपन्‍न करण्‍यात आला.

सविस्‍तर असे की, स्‍थानिक निवासी (Deva Ramesh Burdkar) देवा रमेश बुरडकर व (Pritam Ishwar Khobragade) प्रितम ईश्‍वर खोब्रागडे यांनी मागच्‍या वर्षी हद्द एक मर्यादा या यशस्‍वी चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच चंद्रपूर जिल्‍ह्यातील समस्‍त नागरिकांच्‍या प्रतिसाद, प्रेम आणि आग्रह या भावनांचा विचार करुन हद्द २ या नविन चित्रपटाचा निर्मितीची घोषणा केली होती. त्‍या वचनाला अनुसरुण चंद्रपूरातील ख्‍यातनाम त्रीकुट निर्माता सुदेश भालेकर, चित्रपट लेख प्रितम ईश्‍वर खोब्रागडे, निर्देशक देवा रमेश बुरडकर यांनी हद्द २ या सस्‍पेन्‍स व थ्रीलर पारिवारीक मराठी चित्रपटाचा मुहूर्त स्‍थानिय एन.डी. हॉटेल (मॅजेस्‍टीक हॉल) येथे आयोजित केला होता.

 

मुहूर्त कार्यक्रमाचे अध्‍यक्ष म्‍हणून (M.R. Minister of Forests, Cultural Affairs and Fisheries Hon. Sudhir Bhau Mungantiwar)म.रा. चे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार लाभले होते, तर प्रमुख पाहुण्‍यात (Police Superintendent Ravindra Singh Pardeshi)पो. अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, (Rahul Pavde) राहूल पावडे, (Devrao Dada Bhongle)देवराव दादा भोंगळे, (Dr. Mangesh Gulwade)डॉ. मंगेश गुलवाडे, (Yoga dancer Gopal Mundha) योग नृत्‍यकार गोपाल मुंधडा, (Harish Sharma)हरिश शर्मा हे मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.

 

पारंपारिक कार्यक्रम पध्‍दतीला पुर्णपणे फाटा देऊन एक अनोख्‍या संकल्‍पनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. मा.ना. सुधीरभाऊंच्‍या हस्‍ते दिप प्रज्‍वलन, नटराज पुजन, गणेशमुर्तीचे पुजन व श्रीफळ अर्पण करुन कार्यक्रम पुढे नेत राज्‍यगीत तसेच मेरी माटी मेरा देश या अंतर्गत दिडशे लहान गाडग्‍यात वृक्ष देऊन पंचप्रणाची शपथ देण्‍यात आली. या प्रसंगी बांबुपासून निर्मित जटपूरा गेटची देखणी कलाकृती स्‍मृतीचिन्‍ह म्‍हणून मा.ना. सुधीरभाऊंना तर महाकाली मंदिर व महाकाली देवीची कलाकृती जि.पो.अ. परदेशी सरांना प्रदान करण्‍यात आली. तसेच माजी पोलिस अधिकारी ईश्‍वर खोब्रागडे यांनी संविधानाची प्रत सुधीरभाऊंना प्रदान केली.

आपल्‍या प्रास्‍ताविक भाषणात धनंजय तावाडे सरांनी या पुर्ण प्रकल्‍पातील अडी, अडचणी व व्‍यथा यांचे सत्‍य उपस्थित करुन उपस्थितांना अंर्तमुख होण्‍यास बाध्‍य केले. यानंतर सर्व मान्‍यवररांचे भाषण व मार्गदर्शन झाले.

आपल्‍या अध्‍यक्षीय भाषणात मा.ना. सुधीरभाऊ यांनी अगदी आपुलकी व विनोदी शैलीने मार्गदर्शन करुन उपस्थितांची मने जिंकली यात शंका नाही.

या प्रसंगी हद्द एक मर्यादा तील चित्रपट कलावंतांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. तसेच हद्द २ च्‍या नवोदित कलावंतांच्‍या परिचय सर्व मान्‍यवर व प्रेक्षकांना घडविण्‍यात आला. चित्रपटाचा ट्रेलर सर्वांच्‍या पसंतीस उतरला हे यशाचे गमक. सहभागी होण्‍याचा अल्‍पोपहार व चहापानाने राष्‍ट्रगीत म्‍हणून कार्यक्रमाची सांगता करण्‍यात आली, असे एका पत्रकान्‍वये प्रकाश परमार यांनी कळविले आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा