मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला अजिदादांची दांडी!

0
36

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची चर्चा आहे. (DCM Ajit Pawar) वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड या हॉटेलमध्ये काल गुरूवारी संध्याकाळी स्नेहभोजन पार पडले. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचेही अनेक मंत्री होते. मात्र, अजित पवार हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार मुंबईतच होते. त्यामुळे ते स्नेहभोजनला का आले नाही, असा प्रश्न माध्यमांकडून उपस्थित झाला. त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, कार्यबाहुल्यांमुळे अजित पवार या स्नेहभोजनाला उपस्थित राहिलेले नाहीत. ते अजिबात नाराज नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अजित पवार हे त्यांच्या देवगिरी बंगल्यावरच होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही त्यांच्या अनुपस्थितीचे कारण सांगता आलेले नाही.
पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नसल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा काही माध्यमांनी सुरु केली आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी होऊन दिड महिना लोटला असला तरी अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा