
मुंबई : कर्नाटक सरकारचं एकच ध्येय आहे ते म्हणजे धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करायची. मतांसाठी लाचार असणारे कॉंग्रेस सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांना नको म्हणत आहेत. कॉंग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का काढला ? असा सवाल उपस्थित करतानाच या बाबतीत आता कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मौन सोडावं असे आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. दरम्यान, भारतामध्ये हत्तींची संख्या कमी होत असताना महाराष्ट्रामध्ये हत्ती हा वन्यप्राणी कधी ही नव्हता. गेल्या काही दिवसात गोंदिया, गडचिरोली, भंडारा या भागात हत्ती दिसले.
सिंधुदुर्गमध्ये कर्नाटकातुन हत्तींचा कळप आला. एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये हत्तींना सुद्धा सुरक्षित वाटायला लागलं आहे असेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.