संजय राऊत म्हणाले, “जिंकेल त्याची जागा”

0
30

मुंबई – जागावाटपावरुन कोणीही मतभेत उघड करयचे नाहीत, असे आमच्या तिन्ही पक्षांनी ठरवले असून जिंकेल त्याची जागा, असे सुत्रच आमच्या महाविकास आघाडीमध्ये ठरले असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut on Seat Sharing formula) यांनी केला आहे. राऊत म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी आहे. हे तिन्ही पक्ष एकत्रित लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयावर खासदार राऊत यांनी टीका केली. सरकार भितीपोटी एकही निवडणूक घ्यायला तयार नाही. आपण किती निवडणुका रद्द करणार आहात? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आता भितीपोटी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का? असा प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा