केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण वादात

0
55

 

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुबंई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 च्या नांदुरा ते जळगाव जिल्ह्यातील चिखली रंमथम पर्यत 800 कोटी रुपये खर्च करून 45 किलोमीटरच्या चौपदरीकरण झालेल्या महामार्गाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या मलकापूर येथे होणार आहे.,मात्र हा लोकार्पण सोहळाच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, रस्ता पूर्ण न होताच या रस्त्याचे लोकार्पण होत आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. 45 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यामधील अनेक पुलांचे अनेक ठिकाणी महामार्गाचे काम झाले नसून स्ट्रीट लाईट देखील अद्याप पर्यंत सुरू करण्यात आले नाही शिवाय रस्त्यावर जर एखादा मोठा अपघात घडल्यास या संदर्भात महामार्गावर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. असा सवाल देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केलाय,यामुळे नितीन गडकरी यांची कंत्राटदार आणि स्थानिक नेत्यांकडून दिशाभूल केल्या जात असल्याने नितीन गडकरी यांनी स्वतः आपल्या सूत्रांकडून हा रस्ता पूर्ण झाल्याबाबत तपासणी करून नंतर रस्त्याचे लोकार्पण करावे अशी विनंती बंडू चौधरी, तालुकाध्यक्ष, काँग्रेस मलकापूर, अरुण अग्रवाल,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मलकापूर, गजानन ठोसर,शहराध्यक्ष उबाठा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नितीन गडकरी यांना केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा