छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न

0
75

मुंबई MUMBAI -शरद पवार Sharad Pawar यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीचे प्रयत्न सुरु केले असताना कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरावे, यासाठी NCP राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. ते मविआचे उमेदवार ठरतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात सभा घेणार आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज राहणार आहेत. त्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरावे, यासाठी मविआकडून प्रयत्न सुरु आहेत. आता ते शरद पवारांच्या सभेचे अध्यक्षपद भूषवणार असल्यामुळे मविआच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे संकेत मिळत आहेत. शाहू महाराजांचे मविआतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला गेली तर त्यांच्या उमेदवारीत कोणतीही अडचण येणार नाही, असे बोलले जात आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा