संतप्त भाजप कार्यकर्त्यांकडून सामनाची होळी

0
47

मुंबई MUMBAI : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यामुळे संतप्त BJP भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत सामनाची होळी केली. भाजप कार्यकर्त्यांनी सामनाविरोधात मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सामना व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले. नागपुरातही भाजपच्या असे आंदोलन करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपने आंदोलन केल्याचे सांगण्यात आले.
सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीका करण्य़ात आली. फडणवीसांना उप झाल्याचा वैफल्य आलंय. त्यांना न्यूनगंडाने अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आलीय. ‘आपले मुख्यमंत्री सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले. आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत असल्याचीही टीका करण्यात आली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा