
अमरावती AMRAWATI – च्वाइस बेस्ड् क्रेडीट सिस्टीममुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील (सीबीसीएस) विद्यार्थ्यांपुढे नव्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा वरच्या वर्गातील प्रवेशामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना CARRY ON ‘कॅरी ऑन’ ची मुभा द्या, या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे गेल्या दोन दिवसांपासून अमरावती विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते.
अखेर आज अमरावती विद्यापीठ प्रशासनाने 2023 ते 2024 सत्राच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ देण्याचा निर्णय घेतला. विद्यापिठाच्या या निर्णयामुळे अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील 9 ते 10 हजार विद्यार्थी दिलासा मिळाला. यात विद्यार्थ्यांनी व युवक काँग्रेसचे विद्यापिठाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल ताशे वाजवत जल्लोष यावेळी विद्यार्थ्यांनी डान्स करत आनंद व्यक्त केला.
