
मुंबई MUMBAI : सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आणि राज्यात सत्ताबदल होणार, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LOP Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. मुख्यमंत्री EKNATH SHINDE एकनाथ शिंदे हे सप्टेंबरमध्ये सत्तेतून पायउतार होतील, असे वडेट्टीवार म्हणाले. सत्तेच्या हव्यासापोटी वाट्टेल ते महाराष्ट्रात चालले आहे. राज्यात काहीच अलबेल नाही. आगामी १५ ते २० दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहणार असल्याचे ते म्हणाले.
वडेट्टीवार यांनी दावा केला की, राज्यात मुख्यखुर्ची पासूनच या बदलला सुरुवात होईल, असे खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असे मी म्हणत नाही. पण मुख्यखुर्ची मात्र बदलेल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेल्या स्नेहभोजनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित न राहिल्यामुळे राज्यात अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विरोधकांनी मात्र अजितदादांच्या अनुपस्थितीवरून सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. पावसानं दडी मारल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात 22 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीके संकटात असून सरकारला शासनाला कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागेल असे ११ जिल्हे असल्याचे त्यांनी सांगितले.
