
नागपूर NAGPUR – सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहेत. त्यांचे डोके काम करत नाही. पुन्हा सत्तेत येण्याची संधी नाही. पक्ष गेला, चिन्ह गेलं, राष्ट्रवादी भाजपसोबत आली आहे, पुन्हा कधी सत्तेत येऊ शकत नाही. हे दुःख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना आहे. हे दुःख त्यांनी सामनातून मांडून उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून चूक केली. ती आता यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मुख पत्रातून अशा पद्धतीने टीका करत आहेत.सामना वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार आहोत. वृत्तपत्रात सुद्धा बोलण्याची, लिहिण्याची लिमिट आहे. आमचे मुंबईचे नेते, पदाधिकारी आंदोलनात्मक पवित्रा घेऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढणार आहे. वैयक्तिक टीका करण्याचा अधिकार नाही.
दरम्यान, 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका अजित पवारांसोबत आम्ही लढणार आहोत. विरोधी पक्ष नेते म्हणून काही बोलावं लागतं म्हणून विजय वडेट्टीवार बोलतात. 200 च्या वर बहुमत असलेले आमचं सरकार आहे. आमच्या नेतृत्वाने हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे विरोधकांचे स्वप्न साकार होणार नाही.

गडकरी यांना अडचणीत आणले जातेय का, याकडे लक्ष वेधले असता महाराष्ट्र असो की देशातील सरकार असो एखाद्या विकास कामाच्या किमती वाढल्या तर आक्षेपावर कॅग किंवा महाराष्ट्र ऑडिट डिपार्टमेंट असो त्याचे रिमार्क येतात मग कंपलायन्स करावं लागतं. त्यात खर्च का वाढला, याचे उत्तर दिले की ते डिलीट केले जातात नितीन गडकरी यांना कुणीही अडचणीत आणू शकत नाही. केवळ संभ्रम तयार करण्यासाठी विरोधीपक्ष नेते बोलत आहेत.त्याचा अर्थ भ्रष्टाचार झाला असा होत नाही. गडकरी हे नेते आहेत. काँग्रेसमध्ये दहा तोंडाचे दहा लोक आहेत. भाजपमध्ये तसं नाही. आमचा पक्ष मजबूत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आता नव्याने झाले म्हणून बोलत आहेत अशी टीका केली.
288 मतदार संघ दौरा संदर्भात छेडले असता बावनकुळे म्हणाले, आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांना ताकद देण्याचे काम करणार आहोत. आपला पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रचंड ताकतीने पुढच्या काळात महायुतीला प्रचंड मदत मिळावी, म्हणून आमचं काम सुरू झालं आहे.